डीजीटल अध्यापन


कोरोना काळात शाळा महाविद्यालय बंद आहे म्हणून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून झूम मीटिंग द्वारे इयत्ता दहावीचे वर्ग मे महिन्यापासून घेतले जात आहे. 9 में 2020 महाराणा प्रताप जयंती निमित्त महाराणा प्रतापसिंह चे गाढे अभ्यासक श्री जयपाल सिंह गिरासे यांचे भाषण झूम मीटिंग द्वारे आयोजित केले होते यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर आर पाटील हे उपस्थित होते.


शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे .महाराष्ट्रातल्या अनेक शाळा डिजिटल झालेल्या आहेत यात आमचे विद्यालय ही मागे नाही या शाळेवर प्रेम करणारे आदरणीय भूपेश भाई पटेल उपनगराध्यक्ष यांच्या संकल्पनेतून शाळा डिजिटल झालेली आहे. शाळेसाठी सेन्सेस कंपनीचे दोन मोठे टच पॅनल उपलब्ध करून दिले याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी होणार आहे. हे पॅनल उपलब्ध करून देण्यात सुवर्ण नगरीचे शिल्पकार माझी शालेय शिक्षण मंत्री आ. अमरीश भाई पटेल, आ. काशीराम दादा पावरा, नगराध्यक्षा सौ जयश्री बेन पटेल, शिक्षण समिती सभापती सो चंद्रकला माळी, मुख्याधिकारी श्री डॉ.अमोल बागुल,  श्री. रावसाहेब प्रभाकर चव्हाण, श्री भाऊसौ.राजू भंडारी यांचे मोलाचे योगदान लाभले यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर आर पाटील श्री जितेंद्र भाऊसाहेब यांनी परिश्रम घेतले.




No comments:

Post a Comment