शिरपूर: येथील पांडू बापू माळी मुन्सिपल हायस्कूल शिरपूर येथे विद्यालयाचे आश्रयदाते कै. पांडू बापू माळी यांची ६१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कोरूना च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी झाली.कै. पांडू बापू माळी यांच्या पुतळ्याचे पूजन माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री प्रभाकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले तर प्रतिमापूजन श्री संतोष माळी यांच्या हस्ते झाले. विद्यालयातील विद्यार्थी कु.कृतिका राजपूत,पुर्वा बागुल, रेहान शेख,कुंदन देवरे व प्रा.पी.डी.पाटील यांनी कै. पांडू बापू माळी यांच्या जीवनावर आधारित आपले विचार लेखनबध्द केले व ते विद्यालयाच्या शैक्षणिक ब्लॉग वरती प्रसिद्ध केले.या लेखाचे मान्यवरांनी कौतुक केले.यावेळी गोविंदा प्रतिष्ठानचे श्री डिगंबर माळी मुख्याध्यापक श्री आर.आर.पाटील उपमुख्याध्यापक श्री के पी कुलकर्णी पर्यवेक्षक श्री ए एस कानडे श्री एम एम बैसाने श्री के एन काजी अधीक्षक श्री जे बी जाधव श्री एन एस बडगुजर श्री एस आर गवळी श्री जे जी महाजन ,श्री एस व्ही गिरासे, श्री दीपक माळी,श्री अबालाल माळी, श्री विनोद माळी, श्री दिनेश माळी, श्री ईश्वर माळी, श्री कपिल माळी, श्री मुकुंद माळी, श्री किशोर माळी , विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . शेवटी सर्वांनी कै. पांडू बापू माळी यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.कार्यक्रमासाठी प्रफुल्ल मराठे भीमा माथने यांनी परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment