सबके लिए खुला है मंदिर ये हमारा.................
हे ब्रिदवाक्य घेऊन माझी शाळा ११० वर्षापासून शिरपूर सारख्या दुर्गम पण आता पुढारलेल्या तालुक्यात शैक्षणिक विकासासठी कार्यरत आहे.हिचा प्रांगणातून किती तरी डॉक्टर ,इंजिनिअर ,अधिकारी,राजनेता ,समाजसेवक,पोलीस ,देशाची सेवा करणारे जय जवान -जय किसान देशाची सेवा करण्यासाठी प्रेरित झाले आहेत..
'!! तमसो मा ज्योतिर्गमय !!' हे सुभाषित खर्या अर्थाने या शाळेने सिद्ध करून दाखवले आहे.कितीतरी बदल या शाळेने पहिले आहे.माझ्या शाळेचा जडणघडणीत अनेक थोर व्यक्तींचा सिंहाचा वाटाआहे.कै.प्रल्हादराव पाटील,श्री.डिगंबरभाऊ माळी ज्यांचा देणगीमुळेच शाळेला पांडू बापू माळी हे नाव प्राप्त झाले.खऱ्या अर्थाने शाळेचा आज जो काया पालट झाला तो आदरीय आमदार श्री.अमरीश भाई पटेल ,नगराध्यक्षसो.जयेश्रीबेन पटेल ,उपनगराध्यक्ष श्री भूपेश भाई पटेल व सर्व सन्मानीय नगरसेवक,आजी माजी मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा योगदानातून....
ज्या वेळी राज्यातील असंख्य सरकारी शाळा या बदलत्या काळानुसार शिक्षणाचे दान देण्यास असमर्थ ठरत असताना,खाजगी शाळांचा बाजारात नांगी टाकत असताना माझी शाळा मात्र मोठ्या रुबाबान उभी आहे.कारण आज माजी शाळा सर्वगुणसंपन्न,डिजिटल झाली आहे.कारण शाळेला मन लावणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी लाभले आहेत......
या शाळेचे असंख्य माजी विद्यार्थी ,शाळेवर प्रेम करणारे असंख्य चाहते जे शाळे पासून लांब आहेत त्यांना परत त्यांची शाळा त्यांचा पर्यंत पोहचावी,परत शाळेचे दिवस आठवावेत या साठी व शाळेतील विद्यार्थी ,शिक्षक व इतर कर्मचारी यांना आपल्यातील सृजनशीलता जगासमोर मांडता यावी या साठी मी हा ब्लॉग आपल्या भेटीसाठी आणत आहे.हा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल अशी आपणास आशा करतो धन्यवाद..........
प्रकाशभोई
विनोद माळी
जयेश महाजन
योगेंद्र गिरासे
No comments:
Post a Comment