Thursday, June 11, 2020

कोरोना काळात मुख्यमंत्री सहायता निधी ला विद्यालयाकडून भरघोस मदत







 
शिरपूर :येथील पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री साहय्यता निधी ला दिला.माध्यमिक विभागाकडून ११२९७३/₹ व उच्च माध्यमिक विभागाकडून १७३४३/₹ चा चेक कोरोना संकट मदतनिधी त उपविभागीय अधिकारी डाॅ विक्रमसिंह बादल यांना मा.श्री प्रभाकरराव चव्हाण सदस्य शिक्षण समिती यांच्या हस्ते सपुर्द करण्यात आला.
        सध्या संपूर्ण महाराष्ट्र कोरोना संकटाशी झुंजत आहे अशा संकटकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आव्हान केले या आव्हानाला प्रतिसाद म्हणून विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधी जमा केला. यावेळी मुख्याधिकारी डॉ अमोल बागुल, श्री.हेमंत पाटील श्री,श्यामकांत ईशी, मुख्याध्यापक श्री आर आर पाटील अधीक्षक श्री जितेंद्र भाऊसाहेब हे उपस्थित होते.
या मदत निधी बद्दल शिक्षण समिती सभापती सौ चंद्रकला संतोष माळी तसेच इतर सर्व शिक्षण समिती सदस्य यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. निधी गोळा करण्यासाठी उपमुख्याध्यापक श्री के पी कुलकर्णी पर्यवेक्षक श्री ए एस कानडे श्री के एन काजी श्री एम एम बैसाणे व निलेश गुजर यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment