२१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा......
कोरोनाच्या महामारीत विद्यार्थी व पालक यांचे आरोग्य सुदृढ व संतुलित राहो यासाठी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन योग वर्ग घेण्यात आला. या योग वर्गाला श्री चंद्रशेखर शिंपी योगशिक्षक आर सी पटेल माध्यमिक विद्यालय खंबाळे यांनी यांनी मार्गदर्शन केले यावेळी असंख्य विद्यार्थी व पालक ऑनलाइन योग वर्गाला उपस्थित होते भारत सरकार आयुष्य मंत्रालय यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार श्री चंद्रशेखर शिंपी सर यांनी विद्यार्थी व पालकांना योगाचे धडे दिले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर आर पाटील हेही उपस्थित होते. या वर्गाचे आयोजन श्री योगेन्द्र गिरासे यांनी केले.

No comments:
Post a Comment