Thursday, June 4, 2020

जागतिक पर्यावरण दिन दोन शब्द......

आज 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो आज आपण करुणा सारख्या महामारी शी झगडत असताना पर्यावरण सारखे अतिशय महत्वाच विषयाकडे दुर्लक्ष होता कामा नये हेही तेवढेच महत्त्वाचे म्हणून आपल्यासमोर हा लेख प्रस्तुत करीत आहे.
   सुरुवातीला जागतिक पर्यावरण दिवसाच्या इतिहास पाहूया. 5 जून 1972 रोजी बदलत्या हवामानाविषयी विचार मंथन करण्यासाठी स्टॉक होम येथे पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आणि तेव्हापासून 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जावा असा निर्णय झाला. पहिला जागतिक पर्यावरण दिन 1974 रोजी जगातील 143 देशा साजरा केला.
आज आपल्यासमोर पर्यावरणाशी संबंधित असंख्य समस्या राक्षस याप्रमाणे उभ्या आहेत. आत्ताच उदाहरण द्यायचं झालं तर केरळ येथे हत्ती नेला अननस मध्ये स्फोटक भरून ठार मारण्यात आले अशाप्रकारे देशात जैवविविधतेवर पर्यावरणाचे दुश्मन मोठ्या प्रमाणात आघात करीत आहे आणि यांचा बंदोबस्त करणे खूप महत्त्वाचे आहे अशा प्रकारच्या घटना थांबल्याशिवाय जैवविविधता आपल्याला टिकविता येणार नाही म्हणून असे हिंस्र पर्यावरण विरोधी कृती करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ््.
पर्यावरणातील दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे ग्लोबल वाॅर्मिंग. आज जगाचे सरासरी तापमान माँ दोन अंश सेल्सिअस ने वाढलेले दिसते याला सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वातावरणात वाढलेले co2 चे प्रमाण. कारखाने मोटार गाडी यांच्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे वातावरणातील co2 प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या आपल्या समोर उभी आहे.
 2005 च्या 26 जुलै हा दिवस आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे आणि त्याला कारण म्हणजे पर्यावरणात झालेला असमतोल हवामान बदल प्रदूषण हे होय.
पर्यावरणाशी संबंधित आणखी एक महत्वाची समस्या म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारे वृक्ष कटाई ही आहे. यामुळे हवेतील ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड या वायूंच्या प्रमाणात असंतुलन निर्माण झालेले आहे आणि म्हणून अशुद्ध हवा आपल्याला ग्रहण करावी लागत आहे यासाठी आपल्याला वृक्षरोपण सारखे कार्यक्रम घेणे आवश्यक आहे म्हणून प्रत्येकाने जून ते सप्टेंबर या कालावधीत आपल्या जवळच्या व्यक्तींना वाढदिवसाला एक छोटे रोपटे भेट म्हणून देणे यापेक्षा चांगली भेट होऊ शकत नाही आणि ही प्रत्येकाने आपली मानसिकता बनवली पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला स्वच्छतेचा संदेश दिला आहे आणि ही स्वच्छता आपले पर्यावरण सुदृढ करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते म्हणून देशातील प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता वृक्ष लागवड भूतदया यासारख्या मूल्यांची जोपासना करणे महत्त्वाचे आहे म्हणून आजच्या पर्यावरण दिवशी प्रत्येकाने पर्यावरणाची हानी होणार नाही असा एक तरी संकल्प करणे आवश्यक आहे......
             पर्यावरणाचे रक्षण जीवनाचे संरक्षण.....
                 योगेंद्र नाटूसिंह गिरासे
         पां बा मा म्यु हायस्कूल शिरपूर

1 comment: