तंत्रज्ञानाची झाली किती कमाल
जग झाले आता लहान....
आज तंत्रज्ञानाच्या झालेली प्रगती व विस्तार पाहता जगाच्या सिमा अतिशय लहान झालेले आहेत तंत्रज्ञानात नवीन नवीन बदल घडून येत आहेत आणि या बदलांना शिक्षण क्षेत्रही अपवाद ठरलेला नाही आणि म्हणून जगासोबत चालण्याचा आमच्या विद्यालयाचा हा प्रयत्न अतिशय वाखाणण्याजोगा आहे. जगाच्या काना कोपऱ्यापर्यंत आमच्या पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल शाळेवर प्रेम करणारे व शाळेला आपले माननारे असंख्य माजी विद्यार्थी शिरपूर शहरातले नागरिक आहेत की ज्यांना शाळेची नेहमी आतुरता लागलेली असते आणि म्हणून त्यांच्या काळातील शाळा व आज झालेल्या शाळेतील बदल हे या व्यक्तींपर्यंत पोहोचावे यासाठी विद्यालयातील तंत्रस्नेही शिक्षक श्री पीसी भोई श्री जे जी महाजन श्री योगेंद्र गिरासे श्री विनोद माळी यांनी या ब्लॉगची निर्मिती केली याचा फायदा माजी विद्यार्थी शहरातील नागरिक पालक विद्यार्थी व शाळेवर जीवापाड प्रेम करणारे असंख्य चाहत्यांना याचा नक्कीच फायदा होईल याबद्दल कडी मात्र शंका नाही आज या शिक्षकांनी केलेल्या कामाचा मला सार्थ अभिमान आहे आणि हा ब्लॉग आपल्यालाही नक्कीच आवडेल अशी मी आशा बाळगतो आणि भावी आयुष्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो .
धन्यवाद
श्री आर आर पाटील
. मुख्याध्यापक
No comments:
Post a Comment