स्व. तपन भाई पटेल मेमोरियल हॉल चे उद्घाटन संपन्न
शिरपूर येथील पां बा मा म्यु हायस्कूल शिरपूर येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्ववर्गणीतून स्वर्गीय तपन भाई पटेल यांच्या स्मरणार्थ मेमोरियल हॉल ची निर्मिती केली. हाॅल चे उद्घाटन श्रीमती केतकीबेन पटेल यांच्या शुभहस्ते २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल , उपनगराध्यक्ष श्री भूपेश
भाई पटेल , सौ कृतीबेन पटेल श्रीमती रिमा बेन पटेल, सभापती सौ रेखाताई सोनार नगरसेवक रावसाहेब श्री प्रभाकर चव्हाण, श्री किरण दलाल,श्री दिपक माळी,श्री देवेंद्र राजपूत इरफान मिर्झा सौ.छायाताई ईशी ,सौ.संगिताताई देवरे ,नाजिराबी शेख सौ.अरूणा थोरात,सौ.मोनिका शेटे, मुख्याध्यापक श्री आर आर पाटील उपमुख्याध्यापक श्री के पी कुलकर्णी पर्यवेक्षक श्री ए एस कानडे श्री के एन काजी श्री एम एम बैसाणे श्री जितेंद्र जाधव,श्री एस आर गवळी श्री एन एस बडगुजर हे उपस्थित होते. यावेळी अध्यापनात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असे सौ.जयश्रीबेन पटेल यांनी केले. विद्यालयातील कलाशिक्षक श्री सुरेंद्र पावरा सर यांनी काढलेल्या मा.अमरिश भाई पटेल व तपनभाईं पटेल यांचा स्केचचे प्रकाशन करण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री एन एन पाटील,श्री आर सी पावरा,श्री आर पी गावित ,श्री डि सी पाटील,श्री एच के पाटील,श्री एच एम माळी,श्री बी ए मोरे,श्री डि एच राजपूत,श्रीमती एस एस वसावे,श्री निलेश गुजर श्री शशिकांत माळी,श्री दिपक जाधव,श्री भिमा माथने, प्रफुल मराठे, यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जे जी महाजन यांनी केले.



No comments:
Post a Comment