महिला दिन
माझ्या भारतभूतील स्त्रीची
काय वर्णावी गाथा,
देव लोकात शोभती
सीता सवित्रीमाता ।
आहे इतिहास थोर,
ज्या लढल्या घनघोर,
शत्रूही पुढती तिच्या होती कमजोर
राणी लक्ष्मीबाई माझ्या भारताची पोर।
घेऊन स्वातंत्र्याची आण
बाळ शिवबा महान,
घेऊन वसा जिजाऊचा
फडकविला झेंडा महाराष्ट्राचा।
ती आईत आहे,आहे ती ताईत ।
नात्यांची सुंदर गुंफण तिलाच माहीत ।
सर्व नात्यांना येते पूर्णत्व,
ज्या घरी जपले जाते स्त्रीत्व ।
जिच्या कर्तुत्वाला लेखणीही करते प्रणाम,
तिच्या अस्तित्वाला कोटी कोटी सलाम ।
श्रीमती जे.एन.महाजन
No comments:
Post a Comment