प्रिता रेड्डी
अपोलोची जीवनरेखा
जन्म -हैद्राबाद 1957
शिक्षण -रसायनशास्रतील पदवी. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटिमधून मेडिको मॅनेजमेंटचा कोर्स आणि रुक्मिणी अरुंडले नृत्य शाळेतून नृत्याचा अभ्यासक्रम.
पद -अपोलो हॉस्पिटल्स इंटरप्राई जेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक.
कार्य -संपूर्ण आशियातील सर्वात मोठा आणि जगातील पाचव्या क्रमांकाचा वैद्यकीय सेवा सुविधा पुरविणारा हा समूह बनवला. मेडिको बिझनेस प्रोसेस, फार्मसी, आणि टेलिमेडिसिनसारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आघाडी.
स्त्री आणि पुरुष यांच्यातील भेदभावामुळेच महिलांमध्ये असलेल्या क्षमता आणि ऊर्जेचा योग्यप्रकारे विकास झाला नाही. या वाया गेलेल्या ऊर्जेमुळे राष्ट्रीय आणि सामाजिक नुकसान किती मोठ्या प्रमाणावर झाले आहे, याचा दुर्दैवाने कधीच कोणी गांभीर्याने विचार केला नाही. ज्या महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काही करून दाखवण्याची संधी मिळाली, अशांना सुदैवी म्हणता येईल त्यांनी दाखवलेल्या कर्तृत्वाची एखादी झलक जरी पाहिली तरी महिला शून्यातून कसे विश्व निर्माण करू शकतात, याची कल्पना येते. अशाच प्रकारे कौटुंबिक व्यवसायाला गगनचुंबी बनविणाऱ्या उद्योजका आहेत, प्रिता रेड्डी.
लिज्जत ची लज्जत
ज्योती नाईक
जन्म -सन 1956
शिक्षण -द्विपदवीधर
पद -श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या अध्यक्षा.
कार्य -सन 2001-02मध्ये बिसिनेस वूमन ऑफ द इयर अवॉर्ड. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडला उत्कृष्ट ग्रामीण उद्योग अवॉर्ड. लिज्जत पापड ब्रँड देशात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत लोकप्रिय बनवला. या उद्योगाचे 30ते 40टक्के उत्पादन अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, हॉंगकॉंग, जपान याशिवाय माध्यपूर्वेकडील अनेक देशात निर्यात होते.
विधात्याने स्रीला काय दिले नाही? भूमिचे धैर्य दिले, सारितेची चंचलता दिली. सकाळच्या सूर्यकीरणांची कोवळीक दिली. पौर्णिमेच्या चंद्राचे सौंदर्य दिले. पर्वताईतकी गगनचुंबी मानसिक उंची दिली. अग्नीचे तेज दिले, जलासारखे कशामधेही मिसळून जाण्याचा गुण दिला. दवाप्रमाणे स्नीग्धता दिली. अनं फुलांसारखी कोमलताही बहाल केली. कोमल असणे हे स्रीचे बाह्य रुप आहे. अन्यथा स्री इतकी मजबूत आहे, वजरासारखी कठोर आहे की, आग ओकणाऱ्या तप्त सूर्याचाही तिच्यावर काडीईतका परिणाम होत नाही. स्रीच्या मनाचा विस्फ़ोट झाला तर अवघा समाज भस्म करण्याची धग आणि क्षमता तिच्यामध्ये आहे. लाज, शरम यांनीही शरमेने मान खाली घालावी, असा अवतार ती धारण करू शकते. सरस्वतीच्या रूपातील स्री आनंदी -संतोषी आहे, तर दुर्गा अन काळिमातेच्या रूपातील स्री असुरांचा संहार करणारी आहे.
संकलन-श्रीमती पी.बी.बोरसे
प्रयोगशाळा सहाय्यक
पां बा मा म्यु हायस्कूल शिरपूर


No comments:
Post a Comment