पांडू बापू माळी विद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न...
भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घडविण्यात मोलाचा सहभाग असणाऱ्या महान विभूतींच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा दिनाचे औचित्य साधून व 30 जानेवारी महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शहरातील *पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर* येथे शालेय स्तरावर विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याकरिता *स्व. तपनभाई पटेल मेमोरियल डिजिटल हॉल येथे विद्यालयाचे प्राचार्य श्री. के. पी. कुलकर्णी सर व उपस्थित मान्यवर यांनी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले*
त्यानंतर ठीक 11 : 00 वाजता सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर वृंद यांनी 2 मिनिटापर्यंत मौन धारण करून स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना व महात्मा गांधीजी यांना आदरांजली वाहिली.
त्यानंतर विद्यालयातील गितमंच च्या विद्यार्थिनींनी आपल्या मधुर वाणीतुन महात्मा गांधी यांचे आवडते 'भजन वैष्णव जन तो.....' गायले, यासाठी श्रीमती जे. एन. महाजन मॅडम यांनी परिश्रम घेतले.
यावेळी कार्यक्रमास शाळेचे जेष्ठ पर्यवेक्षक श्री.एम .एम.बैसाणे सर , श्री. एस. आर. गवळी सर, कार्यालयीन अधिक्षक श्री. जे. बी. जाधव भाऊसाहेब, ज्येष्ठ शिक्षिका सौ. जे.एस.सोनवणे मॅडम व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील सर्व उपस्थित व विद्यार्थ्यांनी शालेय पटांगण स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच विद्यालयातील शिक्षिका भगिनींनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरोना संक्रमणाचे उपाय, वसुंधरा वाचवा, पाणी वाचवा तसेच सर्व धर्म समभाव व स्वच्छतेचा संदेश देणारी भली मोठी सुंदर अशी रांगोळी साकारून महात्मा गांधीजी यांना आदरांजली वाहीली. यासाठी कला शिक्षिका श्रीमती एस. एस. वसावे मॅडम, श्रीमती एम.पी. चव्हाण मॅडम, श्रीमती एम.एन.जैन. मॅडम, श्रीमती एस.व्ही. सिसोदे मॅडम, यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. पी. राठोड सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.बी. ए. मोरे सर, श्री. एच.के. पाटील, सर, जे. जी. महाजन सर,श्रीमती जे. एन. महाजन मॅडम, श्रीमती एस.एस. वसावे मॅडम, श्रीमती एम.पी. चव्हाण मॅडम, श्रीमती एम. एन.जैन मॅडम, श्रीमती एस. व्ही. सिसोदे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींनी मोलाचे सहकार्य केले.
No comments:
Post a Comment