नमस्कार,
आज आपण थोर अशा व्यक्तीचं पुण्यस्मरण करीत आहोत , ज्यांच्या नावाने एका छोट्याशा शाळेचा एका मोठ्या वटवृक्षात परिवर्तन झाले आणि आज हे नाव सातासमुद्रापार पोहोचले ते व्यक्तित्व म्हणजे कै. पांडू बापू माळी. त्यांचे सुपुत्र माननीय श्री डिगंबर भाऊ माळी यांच्या देणगीतून माझ्या शाळेला एक नाव प्राप्त झाले आणि आज माझी शाळा या नावाने ओळखले जाते, आणि ज्या शाळेचा मलाच नव्हे तर प्रत्येक शिरपूर करायला अभिमान आहे. अशा थोर व्यक्तीबद्दल लिहावं तेवढं कमीच पण तरी माझा हा छोटासा प्रयत्न आपण स्वीकारावा.
रास्ते आसान नही थे जीस पे वो चले...
गरीबी से हो हर पल लढे...
ना हारे ना थके..
सिर्फ अपने मंजिल तक बडे चले.....
ना स्वार्थ का धन था .ना मोह का मन था...
इसलिये आज भी पूजनीय हमारे पांडू बापू एक नाम था...
असे अजरामर व्यक्तिमत्व म्हणजे कै. पांडू बापू माळी यांना शतशः नमन.
ज्या काळात रुढी परंपरेचा पगडा होता, शिक्षणाविषयी अनास्था होती, अशा काळात श्री डिगंबर भाऊ यांनी माजी आमदार कै. प्रल्हादराव तात्या यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन देणगी दिली.
फळा फुलांचा मळा पाहिजे
आनंदाचा सोहळा पाहिजे....
गावात एका वेळी देऊळ नसलं तरी चालेल....
पण मुलांसाठी शाळा पाहिजे....
कै. पांडू बापू माळी यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील पाळधी, शिरपूर हे त्यांचे मामाचे गाव. आईचे नाव पार्वताबाई वडिलांचे बापू. अतिशय हालाखीची परिस्थिती, उदरनिर्वाहासाठी शिरपूरला मामांकडे आले.
कै. पांडू बापू माळी ४ रु महिनाने किराणा दुकानावर कामाला लागले. तर दुसरा भाऊ राजाराम बापु माळी हे दुसऱ्या दुकानावर दोन रुपये प्रमाणे कामाला जाऊ लागले. परिस्थिती गरिबीची असल्याने शिक्षण घेऊ शकले नाही. त्यांचा स्वभाव गोड व नम्र होता म्हणून ते प्रत्येकाला हवेहवेसे वाटायचे. तिच्या दुकानावर कामाला होते ते दुकान पांडू बापूंचे दुकान म्हणून शिरपूर मध्ये प्रसिद्ध झाले. त्यांच्यात कष्टाळूपणा प्रामाणिकपणा व्यापारी वृत्ती हे गुण होते त्यांचे मामा कै. दत्तात्रय धाकु माळी यांच्या मदतीने एकत्रित किराणा दुकान टाकले.
कै. पांडू बापू माळी यांचे लग्न कै. तानाजी चिंधु माळी यांची कन्या गंगूबाई यांच्याशी लग्न झाले. श्री डिगंबर भाऊ माळी यांच्या रूपाने पुत्ररत्न प्राप्त झाले पुढे डिगंबर भाऊंनी पांडू बापू माळी यांच्या कीर्तीला साजेसा आपला व्यवसाय पुढे नेला व शिरपूर तालुक्यात आपले नाव प्रसिद्ध केले.
शिरपूर वरवाडे नगर परिषद इ.स.१९६० ला माजी आमदार कै. प्रल्हादराव तात्या हे अध्यक्ष होते त्यावेळी नगरपालिकेची परिस्थिती हालाखीची होती म्हणून नगरपालिकेच्या शाळेसाठी श्री राजाराम भाऊ माळी व डिगंबर भाऊ माळी यांच्याकडे ते नही मागितली तेव्हा श्री डिगंबर भाऊंनी त्याकाळात २११११/- रू. भरघोस देणगी दिली . तेव्हापासून माझी शाळा पांडू बापू माळी मुन्सिपल हायस्कूल या नावाने प्रसिद्ध झाली.....
शेवटी एकच सांगते....
आपल्या उत्कट समाज कार्यास
सात होती सढळ सहकाराची
सहकाराची सहकार्याने आज...
उद्धार झाला अगणितांचा....
*कु.पुर्वा बागुल*
*इ .९ वी तु. ब*
*पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर*
No comments:
Post a Comment